PostImage

pramod abhiman raut

Nov. 4, 2023   

PostImage

1 lakh rupees will be received from the 'Lake Ladki' …


 

चिमूर प्रतिनिधी :-

            महाराष्ट्र सरकारने मुलगी जन्मल्यानंतर 1 लाख 1 हजार रुपये देण्याची कल्याणकारी योजना जाहीर केली. या योजनेला 'लेक लाडकी' योजना असे नाव देण्यात आले आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी देखील दिली आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेत गरीब कुटुंबांना त्यांची मुलगी जन्मल्यापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत टप्प्याटप्प्यात ही रक्कम दिली जाईल. 

 पहा कोणाला मिळेल या योजनेचा लाभरा

            ज्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या, पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही अशा मुलींना या योजनेचा लाभ दिला जाईल. तसेच 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. जर कोणाच्या घरी जुळ्या मुलीचा जन्म झाला तर त्याचा फायदा दोन्ही मुलींना मिळेल. जर कोणाला मुलगा आणि मुलगी असेल तर फक्त मुलीलाच या योजनेचा लाभ मिळेल.

            यामध्ये मुलीच्या जन्मावर 5000 रुपये मिळतील. शाळेच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्यावर 6000 रुपये, सहावी वर्गात गेल्यावर 7000 रुपये, अकरावीला जाण्यासाठी 8000 रुपये आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75000 रुपये दिले जाणार आहेत. 

 आवश्यक कागदपत्रे

▪️ पिवळ्या किंवा केशरी रंगाचे शिधापत्रिका, मुलीच्या पालकांचे आधार कार्ड, आई-वडिलांसोबत मुलीचा फोटो, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, निवासी, 

▪️ पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर, ई - मेल आयडी आणि बँक पासबुक असणे आवश्यक आहे. दरम्यान या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊ शकता.